Saturday, July 01, 2006

माझे आवडते मित्र -

रजनीगंधा, आभार, मला पुस्तकाबद्दल लिहायची संधी दिल्याबद्दल.

घरामधे लहानपणापसुन पाहिलेली रेलचेल, पप्पानी दर महिन्याच्या पगारात घेतलेली पुस्तके! ह्या सगळ्याचा परीणाम म्हणा किंवा जन्मजात आवड म्हणा - पुस्तके हा एक माझा weakpoint. त्यातुनच झालेला हा एक प्रकार माझी पुस्तकांची आवड. पप्पा लायब्ररीअन होते आणि घरी पण प्रचंड पुस्तके विकत घ्यायचे. तीच आवड माझ्यात पण उतरली. आज माझे पुस्तकाचे मोठे कपाट वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकाने भरलेले आहे. आजून बरीच पुस्तके विकत घ्यायची आहेत. बाहेर पाउस पडत आहे आणि हातात एक पुस्तक घेउन पायावर शाल टाकुन मी झोपुन पुस्तक वाचतेय - ही माझ्या आनंदाची परिसीमा आहे.

१)नुकतच वाचलेले / वा विकत घेतलेले पुस्तक:
भारतातुन येताना नेहेमी ४-५ तरी पुस्तके घेउन येतेच ह्यावर्षी आणलेल्यातले एक सुन्दर पुतक म्हणजे मिलींद बोकील यांचे शाळा.

२) वाचले असल्यास त्यावर थोडक्यात माहिती:
नववी इयत्तेतल्या मुलाचे विश्व.
शाळेतले मित्र, त्यांची एक विशिष्ट भाषा. मुलींबद्दल आकर्षण. शाळेतल्या इतर गोष्टी. शिक्षक आणि शिक्षीका ना टोपणनावाने हाक मारणे वगैरे एकदम आपल्या शाळेतल्या आठवणी जाग्या करतात.

एक परत वाचलेले पुस्तक म्हणजे - माधवी देसाई यांचे नाच ग घुमा.
माधवी देसाईंची झालेली फरफट वाचताना कधी कधी असह्य होते. एका नामवंत माणसाची मुलगी, साध्या माणसाची पत्नी, एक विधवा, एका नामवंत माणसाची पत्नी, एक घटस्फोटीता त्यावर एक आई. पण त्यानी कुठेही कटुता आणलेली नाही. पहिल्यांदा वाचले तेव्हा काही आशय समजला नव्हता तो आता समजला.
अजुन वाचलेली पुस्तके म्हणजे - नातीचरामी, माणसांच्या गोष्टी, स्वत:विषयी, आप्त, शारदासंगीत,

३) अतिशय आवडणारी / प्रभाव पाडणारी पाच पुस्तके:
हे लिहिणे फारच अवघड आहे. हा blog मराठी म्हणुन मग फक्त मराठी पुस्तकांची नावे देतेय. खाली दिलेली पुस्तकांची नावे देताना हे लिहू की ते लिहू असे झालेले. मला स्वत:ला चरित्र, आत्मचरित्र हे प्रकार वाचायला फ़ार आवडतात. तरी खाली वेगवेगळ्या गटातील पुस्तके द्यायचा प्रयत्न करते.

१. आहे मनोहर तरी - सुनीता देशपांडे
२. शारदासंगीत - प्रकाश संत
३. व्यक्ती आणि वल्ली - पु. ल. देशपांडे
४. स्थलांतर - सानिया
५. बापलेकी - पद्मजा फाटक, दीपा गोवारीकर

नेहेमी वाचनात असणारी पुस्तके म्हणजे - गौरी देशपांडेंची विंचुर्णीचे धडे, मुक्काम, सगळीच म्हणायला हरकत नाही. अनिल अवचटांचे स्वत:विषयी तर एकदम साधेसुधे - त्यांच्यासारखेच कुठेही मुखवटा नसलेले. प्रकाश संत यांची चारही पुस्तके.

४) अजुन वाचायची आहेत अशी पाच पुस्तके:
१. आम्ही आणि आमचा बाप
२. संभाजी
३. माझा साक्षात्कारी हृदयरोग
४. मृद्गंध
५. नेताजी
ही पण यादी न संपणारी आहे. ह्यातली बरीचशी पुस्तके येताना आणलेली आहेत पण वाचन करणे बाकी आहे.

५) एका प्रिय पुस्तकाविशयी थोडेसे:
मला सुनीताबाईंचे आहे मनोहर तरी फार आवडणारे पुस्तक. पुलंच्या व्यक्तीमत्वाखली त्या दडून गेल्या नाहीत. पैसे टाकून करता येण्याजोगी कामे स्वत: केली, ४२ च्या चळवळीत कामे केली पण त्यात वाहुन नाही गेल्या. एखाद्या गोष्टीत तन-मन-धन अर्पून अलिप्त रहाणे अतिशय अवघड - ते त्यांना जमले.

मी ज्यांचे blogs नेहेमी वाचते अश्यानी आधीच लिहुन झालेय तरी पण दोघाना Tag करतेच -
यतीन
अतुल

7 comments:

Unknown said...

मिंट्सः हा कोण अतुल? मी नव्हे नं? मी असलो तर अवघड खेळ आहे हा - माझ्यासाठी - अहो - मराठी वाचन करत नही! इंग्रजी पुस्तके चालतील का?

पी. एस. लिंक्स दुरुस्त करवे लागतील.

GD said...

Good one. I think now i should read नाच ग घुमा.

The other article by you - Books Books Everywhere - in your another blog is too good.

Sumedha said...

"बाहेर पाउस पडत आहे आणि हातात एक पुस्तक घेउन पायावर शाल टाकुन मी झोपुन पुस्तक वाचतेय - ही माझ्या आनंदाची परिसीमा आहे." वा! काय सुख असते न, अगदी माझ्या मनातलं नेमक्या शब्दात बोललीस...

Mints! said...

अतुल, तुच तो अतुल :)

मराठी अजीबात वाचत नाहीस तर मग इंग्रजी पुस्तकांबद्दल लिही.

लिंक्स दुरुस्त केल्या आहेत - Thanks to GD.

सुमेधा :)

Y3 said...

हम्म्म....
आताऽऽ काऽय बरे कराऽऽवे... तू तर भलतेच अवघड प्रश्न घालतेस....!!!

आता मी "tag" झालो असल्याने लिहायला हव... प्रयत्न करेन .
btw, आमचा बाप आणि आम्ही खूप सुंदर पुस्तक आहे.. मी मागच्याच महिन्यात वाचल.. जरूर वाच.

Unknown said...

i completed the tag, btw :)

Rasika Mahabal said...

ranjit desainchya pahilya bayako chi bhachi mazya office madhech ahe.. ti nehemi ranjit desaine kiti chhal kela tichya atyacha te sangate... so I can imagine tyanchya dusarya bayako la pan barach sahan karaav lagal asel. me nakki vachen ata naach ga ghuma