Sunday, March 04, 2007

निर्मोही !!??!!

मेधाने महत्वाचा प्रश्नाला हात घातलाय - तुमच्या पुस्तकांची तुमच्यानंतर तुम्ही काय सोय लावणार आहात? असले अतिशय high funda विषय मला कधीच कसे सुचत नाहीत असा विचार करतच हे लिखाण करतेय.

खरंच माझी पुस्तके माझा जीव की प्राण आहेत. कुणी पुस्तकचे कोपरे वगैरे दुमडुन खुण वगैरे करत असेल तर मला प्रचंड राग येतो. देशात काहीही विकत घ्यायला जमत नसेल तर वाईट वाटत नाही पण दिलखुष बुकस्टॉला जाता आले नाही तर मात्र खुपच त्रास होतो.

मला पुस्तकांची आवड पप्पांच्यामुळे लागली. त्यांनी स्वत:ला पुस्तकांच्यासोबत रहायला आवडेल म्हणुन ग्रंथपालाची नोकरी पत्करली. स्वत:चे कित्येक पगार पुस्तकांवर खर्च केले. आम्हाला कधी बाहेर खायला घेउन गेले नाहीत पण चांगली पुस्तके वाचायला मिळावीत, संग्रही असावीत म्हणुन खुप खर्च केला. प्रसंगी मम्मीशी वादावादी पण झाली असेल. त्यांच्याकडे श्रीमानयोगीचे २ खंड आहेत तेही पहिल्या आवृत्तीतले आणि त्यांनी नावनोंदणी करुन घेतलेले. तसेच पुलंची खुप पुस्तके पहिल्या / दुस~या अवृत्तीतली. प्रकाश संतानी स्वत: स्वाक्षरी करुन भेट दिलेली पुस्तके. असले collection असताना त्याचे पुढे काय हा विचार करावासाच वातत नाही. मला भारतातुन येताना ती सगळी पुस्तके इकडे आणायची खुप इच्छा आहे त्यासाठी पप्पा तर तयार होतील कारण त्यांची पोरे सुस्थळी पडतील याची त्यांना खात्री आहे पण सुबोध आणि मम्मी असे दोन मोठे अडथळे पार करावे लागतील. 'मोह वाईट' वगैरे वाक्ये पुस्तकात लिहायला ठिक पण ती प्रत्यक्ष आचरणात आणणे काही शक्य वाटत नाही. पुस्तकांच्या बाबतीत तर नाहीच. पप्पांच्या पुस्तकांचे जाउदे पण माझ्या पुस्तकांचे काय करायचे? फ़ार काही मोठे collection नाही माझे पण आहे ते माझे आहे. संभाजी, बापलेकी, शरदासंगीत, वनवास, शाळा, गौरी देशपांडेंची बरीचशी पुस्तके, अनील अवचटांची पुस्तके!! माझ्यानंतर माझ्या ह्या लेकरांचे काय होणार? माझ्यानंतरचे जाउदे पण कायमचे भारतात जायचे ठरवले तर त्या पुस्तकांचे काय करायचे? लालूने दिलेले गिफ्ट, बाळुदादानी दिलेली पुस्तके अशी पुस्तके कुणाला नाही देऊ शकणार. काही पुस्तके अगदीच टाकावु आहेत त्यांचे काय करायचे हे ठरवणे खुप अवघड जाणार नाही पण माझ्या प्रिय पुस्तकांचे काय?

माझ्या दागदागीनांचे, साड्या, कपड्यांचे काय करायचे ते ठरवताना कदाचीत मला त्रास होणार नाही. पुस्तकांच्या बाबतीत निर्मोही होणे मला तरी शक्य होईल असे वाटत नाही? तुम्हाला काय वाटते? तुम्ही ठरवलेय तुम्ही तुमच्या पुस्तकांचे तुमच्यानंतर काय करायचे? कुणाला ह्यावर Tag व्हायला आवडेल?

8 comments:

प्रिया said...

मला दे, मला दे!!! :D Jokes apart, खरंच पुस्तकांच्या बाबतीत निर्मोही होणं अवघड. भारतात कायमचं जातानाचं म्हणशील तर मी तुझ्याजागी असते, तर होईल तेवढा खर्च करून भारतात ship केली असती :). पण खरंय, ठराविक वयानंतर आपल्यामागे आपल्या पुस्तकांचं मोल जपणारं कुणी नसेल तर ती सत्पात्री दान करावीत हे मलाही पटतं. मागे एकदा शांता शेळकेंची काही हस्तलिखीते पुण्यात कुणीतरी रद्दीच्या दुकानातून विकत घेऊन जतन केल्याचं वाचलं होतं. आपल्या मौल्यवान पुस्तकांची अशी रद्दी होऊ नये म्हणून वेळीच ती योग्य व्यक्तीस सूपूर्त केलेली काय वाईट?

असो. मला या सगळ्याचा इतक्यात विचार करण्याचं कारण नाही... मला अजून खूप पुस्तकं जमवायची आहेत! :) माझा पुस्तकांचा आणि कॅसेट्सचा छोटेखानी संग्रह पुण्यात मागे ठेवून येताना मलाही खूप वाईट वाटलं होतं. इथे आता हळूहळू पुस्तकं जमा करायला सुरूवात केली आहे. जी काही ७-८ पुस्तकं सध्या जवळ आहेत तीदेखिल छानपैकी शेल्फवरती लावून ठेवायला, त्यांची निगा राखायला मला फार आवडतं. पुस्तकांच्या बाबतीत मोह सोडणं खरोखर कठीण, पण तो वेळीच सोडावा आणि ती सत्पात्री दान करावीत हे बुद्धीला पटतंय! :)

Yogesh said...

पूर्वी इजिप्तमधले राजे मेल्यावर त्यांच्या आवडत्या वस्तू, त्यांचे (जिवंत असलेले) आवडते नोकरचाकर यांना 'ममी' करुन राजाबरोबरच ठेवत. तसं पण करता येईल. :))

पण मला दिली तर त्याचा जास्त उपयोग होईल. :)

Mints! said...

priya :)

yogesh - jaLL mela lakshan te :D

Samved said...

ओह...मला वाटल माझा claim पहीला असेल...पण इथे तर रांग आहे:(
तू त्यांना logically का नाही वाटून टाकत?

संवेद

Samved said...

And Yes, Thanks for your comments on my blog.
One of my friend told me that in a DVD released by FTII, there is Smita's first movie called "Teevra Madhyam".
By the way, this DVD consists of many "first-of" like Jaya Bhaduri!! Crossword has it.

HAREKRISHNAJI said...

नवीन काय ?

Meghana Bhuskute said...

जी. एं.च यावरच मत माहीत असेल ना तुम्हा लोकांना - त्यांनी सगळी पुस्तकं रद्देत द्यायचं टरवलं होतं. जिथून आली तिथे गंगार्पण! आपल्यासारखा कुणी स्वस्तात आणि प्रेमाने विकत नेईल म्हणून!!!

Kamini Phadnis Kembhavi said...

हाच प्रश्ण मलाही पडलाय ब-याच दिवसांपासून,देशवारी करुन परत येताना काहि नाहि आणल तरी चालेल पण bag मधे पुस्तकाचा कोरा वास दरवळाच पाहिजे...
मी वाचते ती बहुतेक मराठी असतात पुस्तकं पोरं इंग्रजी वाचणारे दागिने काय कोणिही नेइल पण ही पुस्तक जिवापाड सांभाळणार भेटल पाहिजे कुणितरी

मेघनानी दिलेला उपाय पण चांगला आहे नाहीतर इथल्या म म ला दान देउन जाव लागेल
( नाही नाही :(((()