मला सगळ्यात जास्ती नकोसा वाटतो तो एकटेपणा. मला आठवतेय तशी मी सतत माणसांमधेच राहीले आहे. पण माणसांच्या गोतावळ्यात राहुनही कधीकधी एकटेपणा घेरतो त्याला काय म्हणायचे? मला आठवतेय ४थी मधे शाळा सुटल्यावर scholaship चा क्लास असायचा. तो झाला की मी आणि मेघु टंगळमंगळ करत घरी जायचो. घरी जाईपर्यंत साधारण २ वाजायचे म्हणुन शाळा सुटल्यावर खाण्यासाठी मम्मी पप्पांच्याबरोबर १०.३० ला चपाती-भाजी किंवा भाजी-भाकरी-लोणी असा डबा द्यायची. वर्गात सगळ्यांचेच तसे डबे यायचे. आम्ही शाळा सुटल्यावर साधारण १२ वाजता तो डबा खायचो.
घरी पोहोचायचे तेव्हा मम्मीच्या शिकवण्या, शिवणकाम, शिवणकामाचे क्लास असे काही ना काहीतरी चालु असायचे. त्यामुळे मग मला राहिलेला भात वगैरे एकटीलाच खावे लागायचे. एकटीला जेवताना अज्जिबत जेवण जायचे नाही. कसे तरी पोटात ढकलायचे आणि अभ्यास किंवा खेळ सुरु करायचा. मला अजुनही कधितरी ते एकटीने जेवलेले आठवते आणि एकदम एकटेपणाची जाणीव होते. गेले काही दिवस असेच एकटीने जेवतेय. घर थंड पडलेले, बाहेर ५ वाजताच दाटुन आलेला काळोख, ह्या सगळ्यामुळे खाण्याची इच्छाच नाहीशी होते. मग हा एकटेपणा घालवण्यासाठी रोज घरी भारतात फोन करायचा किंवा मग रात्री उशीरापर्यंत chatting करत बसायचे. सकाळी मग नीट जाग येत नाही वेळेवर मग निश्चय करायचा कि आजपासुन वेळेवर झोपायचे!
सध्या घरी सुबोधच्या लग्नाची तयारी खुप जोरात चालली आहे आणि मी सगळे मिस करतेय. ते मला मिस करताहेत की नाही महिती नाही, असावेत असे वाटतेय. पण ह्या सगळ्यामुळे मला माझ्या एकटेपणाची जाणीव खुप प्रकर्षाने होते आहे. जेवावे वाटत नाही. काहीही न करता फ़क्त बसुन रहावे असे वाटत रहाते. सगळ्या जगावर चिडचिड होते. पण ती चिडचीड कुणालाच कळत नाही.
गेले काही वर्षे एका अर्थाने एकटीच रहातेय, पण एकटेपणाची सवय मात्र अजीबातच झालेली नाहीये. कधीकधी ह्या गोष्टीचा आनंद होतो कधी स्वत:चा प्रचंड राग येतो.
आज मला सतत ऐकावे वाटतेय असे गाणे -
मै और मेरी तनहायी अक्सर ये बाते करते है।
ह्या गाण्याचा आणि एकटेपणाचा काही संबंध आहे का? असावा ...
3 comments:
kadachit thoDa cynic vaaTel, paN jawalache kahi mojake lok soDale tar "jo to aapaapalaa yethe, kuNee naa aadhaar" asM baryaachadaa vaaTatM. Ulat kadhikadhi koNaakaDoon anapexit maayaa kinvaa maitree miLaaLee, tar aapaN phaar bhaagyawaan aahot asM vaaTaayalaa laagatM. I guess, mood var avalamboon aahe :)
अगं झालं आता थोडेच दिवस! :)
पण खरंच हल्ली पाच वाजताच होणारा अंधार फार depressing असतो! :( काहीच करावसं वाटत नाही. आणि chatting करतेस ना... मग तेव्हाच एकीकडे जेवूण घ्यायचं! रात्री झोपायला मात्र फार उशीर करत जाऊ नकोस. एकटेपणाची जाणीव सध्या मलापण फार तीव्रतेने होते. देशात फोन करून करून पण किती करणार? पण एकटे असताना आपणच आपली काळजी घ्यायची... एकटेपणा कायमचा थोडाच असतो?
नंदन - खरेय बरेचदा हे सगळे त्यावेळच्या मुड वर असते.
प्रिया - हो! आणखिन थोडेच दिवस :) आणि जेवणाचा तुझा सल्ला मानेन नक्की.
Post a Comment