काल प्रिया च्या चाट चा status message ह्या कुसुमाग्रजांच्या कवितेच्या पहिल्या ३ ओळी होत्या. मी कवीतांपासुन नेहेमी ४ हात लांब रहाणारी, पण ह्या ओळी मात्र एकदम भावल्या. तिच्या परवानगीने मग मी तो माझा status message केला (अर्थात तिला दुसरी ह्या कवितेसारखी अजुन एक मस्त कविता मिळालीच!!) त्यावर अजुन एका मैत्रीणीने विचारल्यावरुन ही सगळी कवीता इथे टाकतेय.
जोगीण
साद घालशील तेव्हाच येईन,
जितकं मागशील तितकंच देईन...
दिल्यानंतर देहावेगळ्या सावलीसारखी निघून जाईन...
तुझा मुगुट मागणार नाही,
सभेत नातं सांगणार नाही...
माझ्यामधल्या तुझेपणात जोगीण बनुन जगत राहीन...
~कुसुमाग्रज
सुमेधा, वृषाली सारख्या मैत्रीणीना आश्चर्याचा धक्का बसल्यावाचुन रहाणार नाहीये !!!
5 comments:
दोन्ही चरणांच्या शेवटच्या ओळी केवळ आहेत! मला पण फार आवडते ही कविता....
sahii.. :) sundar kavitaa. :) thanks for sharing with us.
जोगिण या कवितेला चार कडवी आहेत। ती संपूर्ण कविता इथे वाचता येईल।
प्रिया, अभिजीत - खरोखर सुन्दर आहे ही कविता.
तुशार - मी पण चारही कडवी लिहिली आहेत पण वेगळ्या प्रकारे लिहिली आहे (formatting चुकले आहे.) निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
वा! सुंदर कविता!
मिनोती ना? मी त्या कपांच्या फोटोवरून ओळखलं! :)
मस्त लिहीतेस की!
Post a Comment