दिवस उद्याचा हा सवडीचा
रविवार माझ्या आवडीचा
गेले कित्येक रविवार काम, खरेदी, कुणाचे वाढदिवस अशातच चालले आहेत. खुप दिवसापासुन रविवारी फ़क्त आराम करायचा, गाणी वगैरे ऐकत मनसोक्त पुस्तके वाचायची, मनसोक्त चित्रे काढायची इच्छा आहे. मला आठवतात ते सगळे लहानपणीचे रविवार असेच मस्त लोळत पुस्तक वाचलेले किंवा रंगाच्या गराड्यात बसुन असंख्य चित्रे काढलेले. टेलीव्हीजन नावाचा प्रकार मी लहान असताना म्हणजे मी १०वी मधे जाईपर्यंत घरी आलेला नव्हता त्यामुळे तो सगळा वेळ मला माझे बरेच उद्योग करण्यासाठी वापरता यायचा.
रविवार सकाळ सुरु व्हायची ती नेहेमीप्रमाणे पप्पांनी लावलेल्या रेडीओमुळे, जी अजुनही होते कराडला गेले की! मग मम्मीने कप मधे घालुन दिलेले दुध गरम आहे म्हणुन तासभर पित बसायचे. तास अन तास दुध पित बसते ही रोजची ओरडणी रविवारी पण चुकायची नाहीत! मग अंघोळ वगैरे करुन आठ सव्वाआठला बालोपासनेला जायचे आणि रमत गमत साडेदहा पर्यंत परत यायचे. कधी मम्मी पप्पा मंडईत गेलेले असायचे, मग ते येईपर्यंत लैलाच्या आई घरात बसवुन ठेवायच्या. तोपर्यंत मग पेपर अलेला असेल तर (तेव्हा कराडला लोकसत्ता दुपारपर्यंत कधीतरी यायचा) बालविभाग वाचत बसायचे. किशोर, कुमार ही मासीके पण घरी यायची, अमृत पण असायचा काहीतरी वाचत बसायची खोड लागली. मम्मी पप्पा मंडईतुन आले की जेवण करुन जेवुन मम्मी पेपर वाचत बसायची कोडी सोडवणे हा तिचा आवडता छंद होता. दुपारभर चित्रे काढणे, सुबोधबरोबर भांडणे, बाहेर खेळायला जाऊ का अशी भुणभुण लावणे. पप्पांची डुलकी झाली की ते दुपारी विविधभारती, किंवा सिलोन रेडीओवर हिंदी गाणी लावायचे. काही कळायचे नाही पण कानावर पडायचे.
कधी कधी सकाळी उठायला उशीर झाला आणि बालोपासनेला गेले नाही तर मग सकाळचे बालोद्यान ऐकायला मिळायचे. शमा खळे, रचना आणि योगेश खडीकर यांची गाणी अगदी तोंडपाठ होती. पप्पांना गाणी ऐकायची प्रचंड हौस होती (आणि अजुनही तितकीच आहे!) त्यामुळे कामगार सभा, आपली आवड, लहान मुलांची आपली आवड, दुपारी मुंबई ब केंद्रावर लहान मुलांच्यासाठी कथावाचन वगैरे असायचे. फास्टर फेणे, गोट्या पहिल्यांदा तिथे ऐकले. टी.व्ही नव्हता त्यामुळे संध्याकाळी सगळी गल्ली डबाऐसपैस, लगोरी, लपाछपी असले फुटकळ खेळ खेळायचो. पण ते सुद्धा संध्याकाळीच कारण मम्मी पप्पा आज्जीबात दिवसभर घरातुन बाहेर पाठवायचे नाहीत. घरात बसुन वाचन करणे, अभ्यास करणे, चित्रे काढणे हे सगळ्यात महत्वाचे वाटे. आजुबाजुला रहाणारी मुले-मुली म्हणजे एका वर्षात २ वेळा बसले तरी चालते ह्या प्रकारात मोडणारी होती त्यामुळे पण असेल. आठवीनंतर ३ वर्षे शेजार नव्हताच त्यामुळे मग माझेच काही काही उद्योग चालायचे. त्या दरम्यान रवीवारच्या सुट्टीत केलेला एक अतीशय महत्वाचा उद्योग म्हणजे मैत्रीणीन्च्या घरी जाउन वेगवेगळी फुलझाडे गोळा करणे, वेलींना आलेल्या फुलांचे गाठींचे गजरे करणे!!
काय धमाल दिवस होते! गेल्यावर्षी मामेभावंडांचे रविवार बघीतले आमच्याच गावात, ह्या पोरांना रेडीओ माहीत नाही, बालगीते माहीत नाहीत, दिवसभर कसले कसले क्लास आणि टी. व्ही.!! कळत नाही ही मुले काही गमावताहेत की आम्ही खुप सारे क्लास न करुन खुप काही शिकलो नाहीये ...
6 comments:
वा मिंट्स्! शाळेच्या दिवसांची आठवण छान करुन दिलीस. प्रत्येका पिढीला आपल्या पुढच्या पिढीबद्दल असंच काहीसं वाटत असावं बहुतेक. तरीही प्रत्येक पिढी "लहानपण देगा देवा" असं म्हणत बालपणाच्या आठवणीत रमून जातेच!
surekh . raviwar avadla. taslya kaahihi vishesh na karta ghalavleya suttya aata pudhil ayushyat kadhihi milnar naahit ase watte mala kadhi kadhi. :-)
मस्त लिहीला आहे लेख!
मला नेहमी "वीकएण्ड" पेक्षा "रविवार" हा शब्द वापरायला आवडतो. कारण "रविवार" म्हंटले की या लहानपणीच्या निवांत आणि मोकळ्या दिवसाची आठवण येते.
तुम्ही एक छोटे काम करु शकाल का कराडला गेलात की? मला कराडच्या प्रितीसंगमाचा एक फोटो हवा आहे. नेटवर खूप शोधले पण चांगला फोटो मिळाला नाही . Please, जमले तर नक्की फोटो पाठवा.
धन्यवाद.
(email:krishna_kath@yahoo.co.in)
kharach... kaahihi na karataa suTTee ghaalavlee asa kitee divsaat zaalach naahi! :-(
lahaanpaNee maajhaa ravivaarchaa kaaryakram mhaNje sakaaLee DD varchyaa "Rangoli" chyaa aawaajaane uThaaycha, te baghataa baghataa aai-pappa chahaa piNaar aaNi mee aaNi baheeN doodh, mag aai nhaau ghaalaNaar... "e haLu naa ga aai, kitee jorjoraat ghaastes tu Doka!!" mag pohyaanchaa naashtaa, mag pappaanbarobar bhaajilaa jaayachaM... "dudhee bhopaLaa nako naa please.. udyaa aai Dabbyaat deil... malaa naahee aawaDat" mhaNoon laaDaat yaaycha :-) jhakaas jevaN, dupaaree thoDishee jhop... mag sandhyaakaaLee sagaLyaanni kuThetaree firaaylaa jaaycha... ice-cream khaaun parat yaaycha.... :-)
LJ style, Current mood: Nostalgic, Happy....
Thanks Minoti, tyaa divasaanchee aaThawaN karun dilyaabaddal! :-)
सुमेधा, रैना :- खरे आहे तुम्ही म्हणता ते.
कृष्णाकाठ :- फोटो काढणे जमेल असे वाटतेय.काढला तर नक्की पाठवुन देईन.
प्रिया - बघ तुला पण रविवार आठवले ना!
hey, tu maayboli warachi karadkar aahes kaa?
chhaan ch lihites...
Post a Comment