Wednesday, December 14, 2005

सूरपूजा

कोल्हापुरच्या अंबाबाईचे देउळ, संध्याकाळची साधारण चार साडेचार ची वेळ. मी तेव्हा कोल्हापुरला शिकायला होते दोन वर्षे. मी आणि अंजु काहीतरी खरेदीसाठी विद्यापिठातुन लक्ष्मीपुरीमधे आलेलो. सिटीबस मधुन उतरल्यावर देवीला नमस्कार करुन मग बाकीच्या कामाला जायचे ही सवय ठरलेली होती. त्याप्रमाणे मी आणि अंजु अंबाबाईच्या समोरच्या बाजुला जो गणपती आहे त्याचे दर्शन घेउन देवीच्या गाभार्याकडे गेलो. जाता जाता मी अंजुला म्हणाले कोणीतरी गातेय बघ. तिच्या ही गोष्ट लक्षात यायला बराच वेळ लागला. देवीला नमस्कार केला. देवळात फारच कमी गर्दी होती, अजीबात नव्हतीच म्हणा ना!

पुढे जाउन गाभार्यात डोकावुन पाहिले तर आत कोणीतरी सोवळे नेसुन गात होते. मग अम्ही तिथेच गाणे ऐकत बसुन राहीलो. साधारण १५ मिनिटे गेली आणि गायन थांबले. कोणता राग होता, वगैरे मला काही समजले नाही, अजुनही समजत नाही! पण ऎकयला अतीशय सुंदर वाटले. मग गायक देवीला नमस्कार करुन बाहेर आले - पहाते तर पंडीत जसराज! डोळ्यावर विश्वास बसेना. परत एकदा खात्री करुन घेतली मनाशी की तेच आहेत. सोवळे नेसलेले, साधे नम्र भाव असलेले पंडीतजी एकदम फ़ार जवळचे वाटले. पण त्याक्षणाला त्यांची स्वक्षरी घ्यावी असे अजिबात वाटले नाही. ते दृश्य डोळ्यात साठवुन आम्ही आमच्या कामासाठी निघुन गेलो.

त्यानंतर मी जेव्हा जेव्हा देवळात जाते, तेव्हा तेव्हा पंडीतजीनी बांधलेली सुरपूजा कायम मनात झंकारते आणि तो क्षण मी मनातल्या मनात परत जगते.

4 comments:

Nandan said...

लेख छान आहे, आवडला. सूरपूजा (सुरांनी बांधलेली पूजा) आणि सुरपूजा (देवांची पूजा) या दोन्ही अर्थांनी शीर्षक समर्पक आहे.

- नंदन

Atul Sabnis said...

there is a great song in such installations (like ambabai). Pt. Jasraj can add to it. It takes, however, immense peace to listen to the inherent song.

beautiful post!

Gayatri said...

आहा! :) क्ल्पनेतच अंबाबाईच्या देवळातल्या त्या थंडगार फरशीवर बसून सुरांचं मंदिर पाहता आलं या लेखामुळे.

Ojas said...

Awesome post! Khoop nashibwaan ahes tu! 'Swakshari ghayavasa watla nahi' yatunach bhawana pohochlya.