Thursday, September 06, 2007

बेळगाव की बोळगाव

आज प्रकाश संत यांचे ’पंखा’ वाचत होते खुप दिवसानी. त्यातली भाषा, जागांचे उल्लेख सगळे आहेत ते बेळगावचे. बेळगावशी पहीला संबंध कधी आला माहीत नाही. मला आठवतेय तसे गिरिशकाकांच्या लग्नाला की रिसेप्शनला पहिल्यांदा बेळगावला गेलेले ते आठवते. हे सगळे असले तरी बेळगावचा पहीला ऐकीव उल्लेख आठवतो तो म्हणजे रावसाहेब! पु. ल. नी बेळगावच्या भाषेची एवढी सुंदर नक्कल केलीय की बास. पण ते गाव मनापासुन घर करुन राहीले ते मात्र दोन कारणांसाठी - एक म्हणजे आमचे हरिमंदिर आणि दुसरे म्हणजे आज्जीचे घर. हरिमंदिराविषयी मी पामर काय लिहिणार. तिथे मिळालेली शांती जगात मला अजुन कोठेही अनुभवता आलेली नाही.

आज्जी म्हणजे माझ्या वडीलांची मावशी. बहीण गेल्यावरही तितक्याच आपुलकीने आमच्या सगळ्यांचे लाड करणारी आज्जी. मला आज्जी म्हणले आठवणा~या ४ आज्जीपैकी एक. माझे आजोळ कराडच. त्यामुळे आजोळी जाणे वगैरे अप्रुप आम्हाला कधी चाखायला मिळालेच नाही. त्यातुनही अजोळी बरेच तिढे पडल्याने आज्जी, अजोबा आणि एक मामा यांच्याशिवाय कोणी प्रेमाचे वाटु नये अशी परीस्थीती. त्याच न कळत्या वयात आत्या आणि काकांच्या लग्नासाठी म्हणुन बेळगावला रहायला गेले होते. घरात आम्ही १०-१२ चुलत भावंडांची पलटण होती. त्यात मी सगळ्यात मोठी! त्यावेळी आम्हा भावंडांचे एकमेकांशी नक्की काय नाते आहे हे सांगणेही जमत नसे. टि. व्ही. नव्हता त्यामुळे सतत कसला ना कसला तरी खेळ खेळत आमचा दंगा चालायचा. आजोबांचा होलसेलचा मोठा व्यावार होता आणि त्याचे ऑफीस घरात असल्याने त्याची पण वर्दळ सतत असायची. मराठीची वेगळी ढब आधीपासुन माहीत होती पण तिथे राहिल्यावर आमच्याही भाषेत झालेला फ़रक कधी जाणवला नाही. ’आत्ता हेच जेवुन सोडलो बघा.’ असली वाक्ये ऐकुन हसणारे आम्ही २ दिवसात नकळत पणे तसेच बोलायला लागलेलो. घरात राचोटीअज्जा म्हणुन एक स्वयंपाकी होते खुप वयस्कर. ते अजुशी वगैरे कधीतरी इंग्लिशमधे बोलायचे. ऐकुन मजा वाटायची. घरात निम्मे लोक मराठी आणि निम्मे कानडी त्यामुळे सहज दोन्ही भाषा कळायला लागलेल्या. सकाळी अज्जारी दुकानात जाईपर्यंत जरा घरात शांतता कारण निम्मी पलटण उठलेली नसायची. कधीतरी लवकर उठुन अज्जारींच्याबरोबर दुध घ्यायची वेळ आली की ततपप होणार हे नक्की कारण ते नक्की कुठले तरी मराठी वाक्य ऐकवुन हे म्हणजे काय ते सांग असले काहीकाही सांगत! बेळगावमधे राहुनही आज्जी आणि अज्जारी मराठी नेहेमी वाचत त्याचे त्यावेळी आश्चर्य वाटायचे.
समादेवी गल्ली, मारुती गल्ली, गोंधळी गल्ली, रेडीओ टॉकीज, सन्मान, बिस्कीट महादेव, मिलिटरी महादेव, कित्तुर चन्नम्माचा पुतळा, बाळेकुंद्री ही सगळी ठिकाणे तिथे राहील्याने माहीत झाले. लाल मातीने पांढ~या फॉकचे जे काही नमुने झालेले ते बघुन मम्मी जवळपास बेशुध्दच पडायची राहीलेली. बेळगावला खाल्लेली ओल्या काजुची उसळ, आलेपाक अवल्लक्की, कुंदा अजुनही आठवत रहातो. प्लांचेट हा प्रकार तिथे पहिल्यांदा पाहीला. प्रचंड भीती वाटलेली तेही नीट आठवते.
तिथुन पुढे एक वर्षाआड का होईना बेळ्गावला जात आले आणि ते गाव तिथली माणसे, भाषा यांच्या परत नव्याने प्रेमात पडत आले. त्याच दरम्यान कधीतरी पुलंची रावसाहेबची कॅसेट घरी आणलेली. त्याची पारायणे करताना बेळगावची मिठास सतत वाढत राहीली. परवा डिसेंबरमधे बेळगावला जाउन आले बराच फ़रक झालेला जाणवला. आज्जी अजोबा दोघेही थकले. आज्जारींची पुर्वीइतकी भीती पण वाटत नाही पण आदर मात्र पुर्वीपेक्षा दुपटीने वाढलाय. त्यांच्या कर्तुत्वाचा मोठेपणा आता जास्ती भावतो. चुलत भाऊ बहिणी आता खुप मोठे झालेत तरी तेच प्रेम तीच आपुलकी अजुनची आहे. गाव बदलले बोळही आता राहीले नाहीत पण मातीचा रंग, हवा अज्जिबात बदललेला नाही. अजुनही आज्जी बाजारात तेवढ्याच उत्साहाने जाते पण आता धाकटी चुलत बहीण तिच्या सोबत असते.

गाव बदलत जाईलच, माझे जाणे जसे जमेल तसे जेव्हा जमेल तेव्हा ह्या प्रकारात जाईल पण प्रकाश संतांची पुस्तके आणि पुलंचे रावसहेब मला मी पाहीलेल्या बेळगावची आठवण नक्की करुन देतील.

7 comments:

कोहम said...

chaan...avadalya atahavani...

प्रिया said...

:)

guru said...

आठवणी छान शब्दात लिहिता तुम्ही.

बेळगावल कधी गेलो नाही, पण माझा एक मामा तिथे शिकायला होता, पुलंच्या रावसाहेब मधुन बेळगाव बद्दल अधिक कळाले. प्रहार चित्रपटाचे चित्रीकरण पण बेळगाव च्या मिलिटरी कॆंपमधे झाले म्हणतात. नंतर माझे २ मराठी बोलणारे सहकारी मात्र बेळगावचे निघाले. इतक्या वेळा बेळगाव बद्दल ऐकुन एकदा तरी त्या शहराला भेट द्यावीशी वाटते.

सीमाप्रश्नाबद्दलच्या आंदोलनांमुळे मात्र मन अस्वस्थ होते

Vaidehi Bhave said...

chan lihalay. mints

Samved said...

मी ९वीत बेळगावला गेलो होतो (च्या मारी मी आता म्हातारा झालो की...लई वर्षं झाली की..) But I still remember it. एक छोटंस, टुमदार town (शहर आणि गाव यांच्या मधलं). तिथली रेल्वे स्टेशनवरची लाल माती आणि इंदिरा संतांचं गाव म्हणून मी अगदीच त्या गावाच्या प्रेमात होतो. आता एकदा परत जाईन म्हणतो...

Anonymous said...

aaj he Belgaum che post vaachale.. khup chhan vaatale.. majhe aajol belgaum che. ajunahi bharat pheri madhye mi tikade jaavun yetech.

MANOJ said...

मस्तचं. मला वाचताना असे वाटत होते की जी.एं चा ते बेळगावचे असलेमुळे कोठेतरी उल्लेख येईल. आणी बेळगाव की बोळगाव ? ते माहीत नाही, पण कर्नाटक सरकारने चांगल्या बेळगांव नावाचे बेळगावी असे नामकरण केलेले माहीत आहे. बेळगांवची थंडी देखील स्मरणात राहील अशीच आहे.
लिहीलंय खूपचं छान..!